Friday, September 9, 2016

निमंत्रण (मराठी): विशाल किसान कारीगर महापंचायत, १६ ऑक्टोबर २०१६, वाराणसी



निमंत्रण / घोषणा
चलो वाराणसी ! चला गंगातीरी !
अश्विन पौर्णिमा, रविवार दि. १६ ऑक्टोबर, २०१६, स्थळ: भैंसासुर घाट
विशाल किसान-कारीगर महापंचायत
वाराणसी येथे रविवार, १६ ऑक्टोबर २०१६ अश्विन पौर्णिमेला गंगेच्या काठी भैंसासुर घाटावर किसान कारीगर महापंचायतीचे आयोजन केलेले आहे. या पंचायतीत देशभरातील शेतकरी व कारागिरांच्या संघटना एकत्र येऊन अशी मागणी करणार आहेत की,
प्रत्येक शेतकरी व कारागीर कुटुंबाची मिळकत ही सरकारी कर्मचाऱ्यां इतकीच असावी
आणि
या कर्मचाऱ्यां प्रमाणेच ही मिळकत नियमित व ठराविक ही असावी
शेतकरी व कारागीर समाजांची ही मागणी बुलंद करण्यासाठी सहभागी व्हा!
गेल्या काही दशकांपासून शेतकरी व कारागीर समाजांचे शोषण पराकाष्टेला गेले आहे. हे समाज दारिद्र्याने ग्रासलेले तर आहेतच, परंतू याही उपर त्यांची खरी मिळकत सातत्याने खालावत चालली आहे. शिवाय ज्या आदिवासी समाजाची जंगलांतून आणि ज्या लहान व्यापारी समाजाची बाजारपेठांतून हकालपट्टी सुरु आहे ते देखील मूळ स्वरूपात आधी शेती आणि कारागिरीच करायचे.  या सर्व समाजांतील स्त्री-पुरुषांकडे त्यांच्या त्यांच्या व्यवसाया संबंधी मोठे विस्तृत ज्ञान (लोकविद्या) आहे. विद्यापीठांतून दिल्या जात असलेल्या ज्ञाना पेक्षा हे ज्ञान कुठल्याच दृष्टीने  उणे नाही. जोवर लोकांकडील या ज्ञानाला विद्यापीठातील ज्ञानाच्या बरोबरीचा मान आणि प्रतिष्ठा समाजात मिळत नाही, तोवर या समाजांचे शोषण संपुष्टात येणार नाही का त्यांच्या खुशालीचे मार्गही मोकळे होणार नाही. विद्यापीठांतून शिकलेल्यांसाठी योग्य मानली जाणारी मिळकत स्वतः च्या ज्ञानाच्या, म्हणजेच लोकविद्येच्या बळावर जगणाऱ्या सर्वांच्या देखील हक्काची आहे.
महापंचायतीची मागणी हा हक्क प्रत्यक्षात उतरवण्याची मागणी आहे!
एप्रिल २०१६ पासून महापंचायतीची तयारी सुरू आहे. या विषयी याच ब्लॉग वर ८, १६ व १८ एप्रिल आणि ८ सप्टेम्बर २०१६ रोजीच्या पोस्ट कृपया बघाव्यात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यां तील शेतकरी आणि कारागीर संघटनांसोबत संवाद - ज्ञान पंचायती सुरू आहेतच. महापंचायती च्या तयारी विषयी माहिती खालील लिंक वरून वाचता येतील अशा पत्रकांतून मिळू शकेल.
महापंचायती च्या मागणी मागचा विस्तृत विचार मांडणारी पुस्तिका खालील लिंक वर उपलब्ध आहे.
आवाहन
देशातील सर्वच शेतकरी, कारागीर, या समाजांच्या सर्व संघटना, या संघटनांसोबत मैत्री व सहानुभूती चे नाते मानणाऱ्या सर्व संघटना तसेच व्यक्ती या सर्वांना आम्ही असे आवाहन करतो की त्यांनी या महापंचायतीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच महापंचायती च्या आयोजन कार्यात पुढाकार घ्यावा. महापंचायतीच्या मागणी वर भक्कम मोहीम उभारण्याच्या कार्यात सर्व ताकदीनिशी लागावे. आपल्या संपर्कात असलेल्या सर्व सामान्य लोकांत या मागणी वर भक्कम जनमत  तयार करायचे कार्य करावे. आणि या मागणी चे सामाजिक, आर्थिक व तात्विक पैलू सुदृढ आणि संपन्न करायच्या मार्गी आपले विचार व अनुभव लावून लोकविद्या समाजाला शोषणातून मुक्त करायच्या कार्यात सहभाग करावा.
अजून माहिती साठी खालील व्यक्तीं बरोबर संपर्क साधावा.









 







No comments:

Post a Comment